बहुगुणी डेस्क, वणी: भारतीय जनता पार्टी (भाजप) वणी शहर मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा सोमवारी दिनांक 21 जुलै रोजी एस.बी. हॉल, वणी येथे करण्यात आली. यात वणी येथील भाजपचे सक्रिय व धडाडीचे कार्यकर्ते विलास निमकर यांच्याकडे शहर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. विलास निमकर हे रविनगर येथील रहिवासी असून ते व्यावसायिक आहेत. अनेक सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात ते कायम अग्रेसर असतात. तरुणांशी असलेला जनसंपर्क, नागरी समस्यांची जाण यामुळे पक्षाने त्यांच्यावर ही नवीन जबाबदारी दिली आहे. पक्षाने व वरीष्ठांनी जो विश्वास दाखवला तो सार्थकी लावणार. ही संधी मला माझ्या कार्यासाठी आणि समाजासाठी अधिक समर्पित होण्याची प्रेरणा देईल. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. तर भाजपच्या एका सच्चा कार्यकर्त्याला संधी मिळाली, अशी भावना पक्षातून व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Comments are closed.