यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे 20 वे वर्ष… जन्मोत्सव कार्यकारिणी गठित

ऍड कुणाल चोरडिया तर उमेश पोद्दार यांची सचिवपदी निवड

बहुगुणी डेस्क, वणी: कृष्ण जन्माष्टमी निमित्त वणीत विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. संपूर्ण आठवडाभर या निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या निमित्ताने श्रीकृष्ण जन्मोत्सव समितीची स्थापन करण्यात आली आहे. यात अध्यक्षपदी कुणाल विजय चोरडिया तर सचिवपदी उमेश पोद्दार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

कार्याध्यक्षपदी रितेश फेरवाणी, उपाध्यक्षपदी अनिल रेभे, विशाल दुधबळे, सहसचिव सुरेश मांडवकर, कोषाध्यक्ष- सचिन क्षिरसागर, सहकोषाध्यक्ष – शुभम मदान, प्रसिद्धी प्रमुख – निखिल मार्कडे, सहप्रसिद्धी प्रमुख – हर्ष भारवाणी, सहकार्याध्यक्ष राजु रिंगोले, सहसंयोजक मयुर गोयंका यांची निवड करण्यात आली. तर विजय चोरडिया, विजय पुण्याणी, राजेश बत्रा, संतोष मार्कंडे, आशिष गुप्ता, नारायण गोडे, मुलचंद जोशी, दिवान फेरवाणी, राजाभाऊ बिलोरीया, अरुण कावडकर, गजानन बल्लुरवार हे समितीचे सल्लागार म्हणून काम करणार. 

भव्य दिव्य कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा – ऍड कुणाल चोरडिया
यावर्षी जन्माष्टमी महोत्सवाला 20 वर्ष पूर्ण झालेत. त्यामुळे यावेळी गेल्या वर्षी पेक्षा भव्य दिव्य हा महोत्सव राहणार आहे. संपूर्ण आठवडभर हा महोत्सव रंगणार आहे. भारतातील नामवंत कलाकार या निमित्ताने वणीत येणार आहेत. याशिवाय स्थानिकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावावी अशी सर्वांना विनंती आहे.
– ऍड कुणाल विजय चोरडिया, अध्यक्ष श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती

22 ऑगस्टला लखबीर सिंह लख्खा वणीत 
26 ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी आहे. वणीकर दर वर्षी यावेळी नवीन काय याची आतुरतेने वाट पाहत असते. दिनांक 22 ऑगस्टला सुप्रसिद्ध गायक लखबीर सिंह लख्खा यांच्या कार्यक्रमाने जन्माष्टमी सप्ताहाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर संपूर्ण आठवडा विविध कार्यक्रम, उपक्रम, स्पर्धा भाविकांसाठी राहणार आहे, अशी माहिती कुणाल चोरडिया यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.