मध्यरात्री उत्साहात साजरा झाला श्रीकृष्ण जन्मोत्सव

जितेंद्र कोठारी, वणी: श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव वणीतील अमृत भवन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. मध्यरात्री 12 वाजता महाआरती करून श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा झाला. यावेळी बाळकृष्ण आणि गोपिकांच्या वेशातील चिमुकल्यांनी लक्ष वेधले होते. आज दुपारी 11 वाजता अमृत भवन येथे दहीहांडी तसेच गोपाळकाला व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर 4.30 वाजता अमृत भवन येथून भव्य शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रेचे विविध देखावे, ढोल पथक, भजन मंडळ हे प्रमुख आकर्षण राहणार आहे. तसेच यावेळी संपूर्ण शोभायात्रा ही रथातून निघणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे अध्यक्ष ऍड. कुणाल चोरडिया यांनी केले आहे. 

बुधवारी दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता विजय चोरडिया यांच्या निवासस्थानावरून श्रीकृष्ण मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक निघाली. सजवलेल्या पालखीची मिरवणूक काढून अमृत भवन येथे मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली. तर रात्री 9 वाजेपासून जन्मोत्सव उत्सवाला सुरुवात झाली. मध्यरात्री 12 वाजता मुख्य कार्यक्रम श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा करण्यात आला.

रात्री महाआरती घेण्यात आली. भाविकांनी गुलाल उधळून व फटाके फोडून जन्म सोहळा साजरा केला. जन्मोत्सवा निमित्त अमृत भवनला विद्युत रोशनाईची सजावट करण्यात आली होती. जन्म सोहळ्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले. जन्म उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. आज गुरुवारी दिनांक 7 ऑगस्ट रोजी दुपारी 11 वाजता अमृत भवन येथे दहीहांडी तसेच गोपाळकाला व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. 

रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा – ऍड कुणाल चोरडिया
गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही जन्माष्टमी निमित्त भव्य शोभायात्रा वणीतून निघणार आहे. या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण हे मध्यप्रदेश बालाघाट येथील महाकालची झांकी राहणार आहे. यासोबत हिंगणघाट येथील 60 लोकांचे भजन पथक, तर गोंदिया येथील डिजे धुमाल हे ढोलपथक येणार आहे. विशेष म्हणजे यावेळी संपूर्ण यात्रा ही रथातून निघणार आहे. या शोभायात्रेला मोठ्या संख्येने हजेरी लावावी अशी सर्वांना विनंती आहे.
– ऍड कुणाल विजयकुमार चोरडिया, अध्यक्ष जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती

कुणाल चोरडिया यांच्या मार्गदर्शनात व मयूर गोयनका, हितेश गोडे, उमेश पोद्दार, रितेश फेरवाणी, शुभम मदान, राजू रिंगोले, स्वाती चोरडिया, विद्या मुथा, विशाल दुधबळे, निखिल मारगंडे, संतोष लक्षेटीवार, अमोल धानोरकर यांच्या सहकार्यातून समितीचे सदस्य व स्वयंसेवक उत्सवाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.