श्रीराम नवमी उत्सव समिती राबवणार विविध उपक्रम

समितीच्या लक्ष्मीनगर शाखेचे थाटात उद्घाटन

0

जब्बार चिनी, वणी: श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबविण्यात येतात. संघटनात्मक बांधणीच्या दृष्टिकोनातून श्रीराम नवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवी बेलूरकर यांच्या हस्ते येथील लक्ष्मीनगरमध्ये रविवारी शाखेचे उद्घाटन झाले.

Podar School 2025

शहरात श्रीराम नवमी उत्सव समितीच्यावतीने अनेकदा जनहितार्थ व समाजपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. प्रत्येक प्रभागात उत्सव समितीची शाखा निर्माण करून संघटनात्मक बांधणी व हिंदूत्ववादी चळवळ उभारण्याची संकल्पना साकार करण्यात येईल. असे मत यावेळी बेलूरकर यांनी व्यक्त केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

याप्रसंगी प्रमुख पाहुणे सतीश पिंपळे, प्रा. हेमंत चौधरी, विलन बोधाळकर, सुनील पानघाटे, अशोक राऊत, विठ्ठल हेपट, डॉ.सतीश चाहारे, राजू घाटे यांची उपस्थिती होती. तर सर्वानुमते शाखेचे प्रमुख प्रणव सतीश पिंपळे, शाखा उपाध्यक्ष रूपेश राजूरकर, शाखा सचिव बंटी धानोरकर, सदस्य छोटू मोहूर्ले, सचिन चट्टे, निखिल ऐकरे, राहुल उपलेनचिवार,

 

अभि वनकार, प्रवीण, आसुटकर, मंगेश बदखल, साई बद्दमवार, आशीष दुमोरे, वैभव जोगी, अमोल चिपडे, सुरेश चिकटे, रामनवमी उत्सव समितीचे उपाध्यक्ष कुंतलेश्वर तुरविले, कोषाध्यक्ष संतोष डंभारे, सिडाम, कौशिक खेरा, आशीष डंभारे, नितेश मदीकुंटावार, पंकज कासावार, पवन खंडाळकर, मयूर मेहता, रवी रेभे, सूरज निकुरे, रोशन मोहितकर, चैतन्य तुरविले आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.