श्रीरामपूरवासियांसाठी डॉ. लोढा ठरले देवदूत

0

मारेगाव: मारेगाव तालुक्यातील आदिवासी बहुल दुर्गम भाग, विकासा पासून कोसो दूर असलेल्या श्रीरामपुरसी स्वातंत्र्य मिळाल्या पासून रस्त्याची प्रतिक्षा करीत होते. निवडणूक काळात इथे उमेदवारांनी केवळ आश्वासने दिले. निवडणूक आल्यानंतर लोकप्रतिनिधींनी मात्र त्यांच्याकडे कायम दुर्लक्ष केले. शासन दरबारी, लोकप्रतिनिधींकडे रस्त्यासाठी मागणीची विनवणी केली. मात्र लोकप्रतिनिधीने लक्ष न दिल्याने श्रीरामपुरवासी आदिवासी बांधव तालुक्याला येण्यासाठी अनेक वर्षांपासून खस्ता खात होते. अखेर डॉ. महेंद्र लोढा यांनी समाजात ‘जिथे सुविधाची कमी, तिथे आम्ही’ या उक्तीप्रमाणे सरसावले. श्रीरामपुरवासियांना जाण्यासाठी रस्ता नसल्याचे माहित होताच डॉ. लोढा यांनी दिवस रात्र एक करुन अवघ्या 30 तासात ग्रामस्थांच्या श्रमदानातून व जेसीबी लावून रस्ता तयार केला. तोही स्वतःच्या खर्चातून.

श्रीरामपुर कोलाम पोडावरील लोकांना रस्ता म्हणजे केवळ एक स्वप्नच बनले होते. पावसाळ्यात गावातील एका व्यक्तीला आजारपणात रस्त्या अभावी उपचारा करीता तालुका स्थळी वेळेवर आणता न आल्याने त्याचा मृत्यु झाला होता. रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासही अडचण येत होती. लोकप्रतिनिधींच्या निदर्शनात ही बाब आणून दिली गेली. मात्र लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले. ही बाब वणीतील प्रतिष्ठीत डॉक्टर आणि समाजसेवक डॉ. महेंद्र लोढा यांच्या निदर्शनात आली. त्यांनी हे गाव दत्तक घेतले. त्यांनी जेसीबी लावून श्रमदानातून केवळ 30 तासात रस्ता तयार केला. तसेच गावात लवकरच आरोग्य, औषध, पाणी, विज, डिजिटल अंगणवाडी सह गावातील बेरोजगार युवकाना बँड पथक तयार करुन प्रशिक्षण देवून बँड पथक च्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देण्याचा विडा उचलला.

वणी विधानसभा क्षेत्रातील जवळपास शंभर आदिवासी गावे डॉ.लोढा यांनी दत्तक घतेले असून मारेगाव तालुक्यातील 50 गावांचा यात समावेश आहे. शिवनाळा येथेही कित्येक वर्षांपासून पाण्याची समस्या आहे. महिलांना 2 क़ी.मी. अंतरावर जाऊन शेतातून विहिरीचे पाणी आणावे लागत होते. अखेर डॉ. लोढा यांनी 2 किमी अंतरावरून पाईपलाइन टाकून गावात तीन ठिकाणी पाण्याचे स्टँड निर्माण केले. एकीकडे लोकप्रतिनिधी कर्तव्य आणि जबाबदारीत कसूर ठेवत असताना कोणत्याही पदावर नसलेले समाजसेवेचा वसा घेतलेले डॉ. लोढा आदिवासी बहुल वस्तीसाठी देवदूत ठरत आहेत.

वणी बहुगुणीशी बोलताना डॉ. महेंद्र लोढा म्हणाले की…
आपन कोणत्या स्वार्थी भावनेतून श्रीरामपूरवासियांसाठी रस्ता बनवित नसून, वंचित घटक हा मुख्ये प्रवाहात यावा आणि त्यांना मुलभुत गरजा मिळाव्या यासाठी हा प्रयत्न आहे. अशा मागास भागासाठी आपली सेवा देऊन जो आनंद होतो, त्या जाणीवेतून आपण कामे करणार.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.