सिंधी येथील तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या

चंद्रपूर येथे उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: सिंधी येथील एका युवकाने विष प्राशन केले. त्याला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले होते. अखेर गुरुवारी त्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अंकुश अरुण महारतळे (27) असे मृत तरुणाचे नाव आहे.

सिंधी येथील अंकुश याने दि. 10 नोव्हेंबरला सायंकाळी 5 ते 6 वाजताच्या दरम्यान आपल्या राहत्या घरी कीटकनाशक प्राशन केले होते. याबाबतची मीहिती त्यांच्या घरच्यांना मिळाली. त्यांनी त्याला तात्काळ मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

मात्र उपचारादरम्यान अंकुशची तब्येत पुन्हा खालावत गेल्याने त्याला चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु तेथे उपचार सुरू असतानाच गुरुवारी दि. 11 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी अंकुशची प्राणज्योत मालवली.

अंकुशकडे 6 ते 7 एकर शेती असून सततची नापिकी आणि शासनाकडून न मिळणारी मदत यामुळे वैतागून जाऊन अंकुशने घरीच मोनोसिल नावाचे कीटकनाशक प्राशन केले. अंकुशच्या मागे आईवडील, एक लहान भाऊ व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

हे देखील वाचा:

नायगाव (बेलोरा) फाट्याजवळ दुचाकीचा अपघात, चालकाचा मृ्त्यू

नगर पालिका गाळे प्रकरण: ठरावामुळे व्यापा-यांना दिलासा

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.