वणीत स्माईल फाउंडेशनतर्फे ठिकठिकाणी वृक्षारोपण

आतापर्यंत 150 पेक्षा अधिक वृक्षारोपण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: स्माईल फाउंडेशनतर्फे शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपणाचा उपक्रम घेण्यात आला. यात आतापर्यंत 150 पेक्षा अधिक झाडे लावण्यात आली. दिवंगत गुलाबराव खुसपुरे, अक्षय गजानन दाढे, शुभांगी भालेराव, देवीलाल मेहता, नरेंद्र नगरवाला आणि सुनंदा धर्मदास पिदुरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपणाची मोहीम राबविली गेली. आतापर्यंत या उपक्रमांतर्गत एसपीएम शाळा, जनता विद्यालय, नगरपरिषद शाळा क्रमांक सात, नऊ, महादेव नगरी तसेच शहराच्या अन्य भागात वृक्षारोपण करण्यात आले.

जागतिक तापमान वाढीचा फटका सर्वांना बसत आहे. दरवर्षी तापमानात प्रचंड वाढ होत आहे. याचे कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात होणारे शहरीकरण. सोबतच प्रचंड अशी वृक्षतोड. ही जाणीव ठेवून स्माईल फाउंडेशन दरवर्षी वृक्षारोपण आणि संगोपन करते. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सागर जाधव यांनी दिली. त्यांच्या टिमचे सदस्य पीयूष आत्राम, आदर्श दाढे, विश्वास सुंदराणी, उत्कर्ष धांडे, गौरव कोरडे , रोहित ओझा, रोनक बडखल, सिद्धार्थ साठे हे आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरणावर वर्षभर काम करतात.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

विजयबाबू चोरडिया, किरण दिकुंडवार, मनीष कोंडावार, सुनील कातकडे, दिलीप कोरपेनवार, चंदू परेकर, देवेंद्र अग्रवाल, गजानन कासावर, दत्ता मालगाडे, हितेश मेहता, पत्रकार संदीप बेसरकर, गजेंद्र काकडे, नरेश बेलेकर, निकेश खाडे, गौतम जिवने, अमोल भोयर, सुनील इंदुवामन ठाकरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ठिकठिकाणी हे वृक्षारोपण झाले.

Comments are closed.