अखेर कोंडवाड्या समोरील अतिक्रमण हटविले

चार वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पालिकेची कारवाई

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नगर पालिकेच्या मालकीचे असलेल्या शहरातील टुटी कमान चौक जवळील कोंडवाडा समोर काही अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे कोंडवाडा अभिकर्त्याला जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. याबाबत वेळोवेळी नगरपालिकेकडे तक्रार करण्यात आली होती. अखेर आज हे अतिक्रमण हटवण्यात आले.

नगर पालिकेच्या मालकीचा शहरातील टुटी कमान चौक जवळ कोंडवाडा आहे. हा कोंडवाडा शहरातील आणि परिसरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला जातो. मात्र काही दिवसांपासून हा कोंडवाडा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला होता. सदर कोंडवाडा समोर भेल सेंटर व चहा कॅटीन वाल्यांनी अतिक्रमण केले होते. परिणामी शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी अडचण निर्माण झाली होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

गेल्या चार वर्षांपासून कोंडवाड्या समोरील अतिक्रमण हटविण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत होते. अतिक्रमण धारकांनी मनमानी कारभार करीत लाकडी फाटे व ताडपत्री टाकले होते. मात्र या प्रकरणी पालिकेने कारवाई केल्याने समाधान व्यक्त होत आहे.

हेच ते अतिक्रमण

Comments are closed.