तुम्ही जागा सुचवा, आम्ही झाड लावू… स्माईल फाउंडेशनचा उपक्रम

वॉटर सप्लाय येथील कार्यालय किंवा 7038204209 या क्रमांकावर संपर्क साधावा

वणी बहुगुणी डेस्क: तुम्ही जागा सुचवा आम्ही झाड लावू हा उपक्रम स्माईल फाउंडेशनने सुरू केला आहे. स्माईल फाउंडेशन दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपणाचा उपक्रम राबवत असते. याही वर्षी हा उपक्रम होणार आहे. वृक्षारोपणास योग्य अशी जागा नागरिकांनी सुचवावी. त्या ठिकाणी स्माईल फाउंडेशन वृक्षारोपण करेल. अधिक माहितीसाठी प्रा. सागर जाधव 7038204209 यांना संपर्क साधावा तसेच वॉटर सप्लाय येथील कार्यालयात देखील भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Podar School 2025

शिक्षण आरोग्य पर्यावरण या मूळ क्षेत्रांसह अनेक क्षेत्रातही स्माईल फाउंडेशन काम करते. मागील वर्षी फाउंडेशनने जवळपास 500 झाडे लावलीत. आवश्यकता असेल तिथे ट्रिगार्डची देखील व्यवस्था केली. यासाठी लागणाऱ्या खर्चाची जबाबदारी स्माईल फाउंडेशनच्या सदस्यांनीच उचलली. लवकरच वृक्षारोपण उपक्रम सुरू होईल. जे कोणी झाडे, ट्रीगार्ड किंवा अन्य मदत करू इच्छितात त्यांनी संस्थेच्या वॉटर सप्लाय येथील कार्यालयात संपर्क साधावा. नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष सागर जाधव यांनी केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.