रात्री झोपेत मुलाला सर्पदंश, विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

उपचारादरम्यान सोडला प्राण, परिसरात हळहळ....

बहुगुणी डेस्क, वणी: घरात झोपून असलेल्या एका मुलाचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. मुकुटबन येथे दिनांक 24 मे रोजी ही घटना घडली. संस्कार रवींद्र आंबोरकर असे मृत मुलाचे नाव आहे. तो विद्यानगरी परिसरात राहत होता. शनिवारी रात्री जेवणानंतर घरातील सर्व मंडळी झोपले होते. रात्री उशीरा आंबोरकर यांच्या घरात एका विषारी सापाने प्रवेश केला. दरम्यान गाढ झोपेत असलेल्या संस्कारला सापाने दंश केला. संस्कारला काहीतरी चावल्याचा भास झाला. त्यामुळे तो झोपेतून उठला. तेव्हा त्याला बेडजवळ एक साप दिसला. दंश होताच काही वेळातच त्याच्यावर विषाचा परिणाम होऊ लागला. संस्कारला उपचारासाठी वणी येथे रवाना करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. परिसरात सर्पदंशाच्या वर्षभर घटना घडत राहतात. मात्र रुग्णालयात ऍन्टी वेनम लस नसल्याने दंश झालेल्यांना तातडीने उपचार मिळत नाही. त्यामुळे अनेकांना नाहक जीव गममावा लागत आहे. 

सावधान… ! बँकेतून पैसे काढत आहात? भामट्यांचा 1 लाखांवर डल्ला

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.