विवेक तोटेवार, वणी: राजूर (इजारा) येथील युवकाला तलवारीसह फोटो टाकून हिरोगिरी करणे चांगलेच महागात पडले. त्याने तलवारीसह फोटो सोशल मीडियात पोस्ट केला होता. याची माहिती मिळताच शनिवार 9 मार्च रोजी सकाळी 10 वाजता त्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. सुमित भास्कर खोके (24) रा. राजूर इजारा असे आरोपीचे नाव आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेला तलवारी घेतलेला फोटो व्हायरल झाला होता. याची माहिती एलसीबीला यवतमाळ यांना मिळाली. त्यांनी त्वरित कारवाई करीत सुमित याच्या राहत्या घरी तपासणी केली. त्याच्या घरात त्यांना तलवार आढळून आली. पोउपनी रामेश्वर कांडूरे यांच्या फिर्यादीवरून सुमित याच्यावर आर्म ऍक्टच्या कलम 4, 5 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील कारवाई वणी पोलीस करीत आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.