समाजशास्त्र विभागाची अपंग निवासी कर्मशाळेला शैक्षणिक भेट
रोहण आदेवार, वणी: येथील लोकमान्य टिळक महाविद्यालय समाजशास्त्र विभागाच्या वतीने शनिवारी अपंग (दिव्यांग) निवासी कर्मशाळा वणी येथे शैक्षणिक भेट देण्यात आली. या वेळी महाविद्यालयातील शिक्षकांनी अपंग विद्यार्थ्यांच्या कला, ते बाहेर पडून ते काय करतात या बद्दल मार्गदर्शन केले. या निमित्ताने समाजशास्त्र विभागाकडून अपंग विद्यार्थ्यांना फळ, बिस्किट व खाऊ वाटप करण्यात आले. या मधून लोकमान्य टिळक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आजच्या तरुण पिढीला एक अनोखा संदेश दिला.
या नंतर विद्यार्थ्यांनी अपंग मुलांबद्दल आपले मत व्यक्त केले. अपंग विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी चर्चा केली त्यांच्या कला दाखविल्या. त्या नंतर अपंग (दिव्यांग) निवासी कर्मशाळा येथील शिक्षकांनी महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे आभार मानले.
यावेळी समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. नीलिमा दवणे, व प्रा. किशन घोगरे आणि विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्य. डॉ अरुंधती निनावे यांनी प्रोत्साहन दिले.