सोमनाळा फाट्याजवळ अपघात; एक ठार तर दुसरा जखमी

भरधाव टिप्पर व दुचाकीची धडक, मृतक ग्रामपंचायत सदस्य

बहुगुणी डेस्क, वणी: वणी–मारेगाव रोडवरील सोमनाळा फाट्याजवळ 11 डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून दुसरा जखमी आहे. मृतकाचे नाव प्रवीण तुळशीराम येरमे (वय 45 वर्षे, रा. पांढरकवडा–पिसगाव, ता. मारेगाव) असे आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्रवीण आणि रवी येरमे हे सख्खे चुलत भाऊ असून काही कामानिमित्त ते वणी येथे आले होते. कामे आटोपून ते दुचाकीने आपल्या गावी परत जात असताना सोमनाळा फाट्याजवळ एका भरधाव टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालक प्रवीण येरमे जागीच ठार झाला, तर मागे बसलेला रवी येरमे सुदैवाने बचावला.

मृतक प्रवीण येरमे हे पिसगाव येथील ग्रामपंचायत सदस्य असल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्दैवी घटनेने पिसगाव आणि पहापळ परिसरात शोककळा पसरली आहे.

Comments are closed.