सोयाबीनवर चक्रभुंगा, खोडमाशीचा प्रादुर्भाव

उत्पन्नात प्रचंड घट होण्याची शक्यता, कृषि विभागाद्वारे शिबिर

0

विलास ताजने (मेंढोली) : गत हंगामात कापूस पिकावर बोन्डअळी आल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झालें. या वर्षीही बोन्ड अळी येण्याची शक्यता असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला पसंती दिली.सोयाबीनची गुणवत्ता लक्षात घेता हे पीक शेतकऱ्यांसाठी एक आशावादी पीक ठरेल असे वाटत होते. मात्र सोयाबीनवर आलेल्या विविध प्रकारच्या किडीमुळे शेतकरी धास्तावले आहे.

Podar School 2025

यावर्षी १० जून नंतर पावसात प्रचंड खंड पडला. पाऊस येणारच या आशेने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु पेरणी नंतर जून महिना कोरडा गेला. परिणामी सर्व बियाणे न उगवता केवळ सखल भागातील सोयाबीन उगवले. मात्र जुलैच्या मध्यांतरी पाऊस पडल्यानंतर सर्व बियाणे कमी जास्त प्रमाणात उगवले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हमखास सोयाबीनचे उत्पन्न होणारच या आशेने शेतकरी तणनाशक, कीटकनाशके वापरून पिकावर खर्च करीत आहे. परंतु पावसाचा खंड पडला आणि पीक वाढिच्या अवस्थेत असताना फुलोऱ्यावर आले. सध्या तर सोयाबीनवर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. मेंढोली येथील शेतकरी विवेक मुके, सुरज बलकी आदीच्या शेतात खोडमाशी आणि चक्रभुंगा किडींचा प्रादुर्भाव दिसून आला. यामुळे कीडग्रस्त झाडे वाळत आहे. अळी झाडाचे फांदी व खोड पोखरून पोकळ करीत आहे. यामुळे शेंगा धरण्याच्या प्रमाणात, दाण्याच्या संख्येत आणि वजनात प्रचंड प्रमाणात घट येऊ शकते. सध्या सदर कीड कमी प्रमाणात आहे.

शेतकरी पिके वाचविण्यासाठी क्लोरपायरीफास, मोनोक्रोटोफास आदी कीटकनाशके फवारीत आहे. एकूणच कपाशीवरील बोन्ड अळी आणि सोयाबीन पिकावरील कीड पाहता यंदाचा शेती हंगाम बळीराज्यासाठी धोक्याची घंटी देणारा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

“कृषी विभाग द्वारा शेतकरी प्रशिक्षण शिबिर”

कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण द्वारा जिल्हाअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन शिंदोला जवळील ‘सचिन फायबर्स जिनिंग, आबई येथे दि.९ ऑगस्टला गुरुवारी सकाळी १०,३० वाजता करण्यात आले आहे.

सदर शिबिरात कपाशी पिकावरील शेंदरी बोन्डअळीचे व्यवस्थापन, खरीप पिकांचे कीड व्यवस्थापन, कीटकनाशक फवारणी करतांना घ्यावयाची काळजी आणि हळद पीक व्यवस्थापन आदी विषयावर मार्गदर्शन व चर्चा होणार आहे. तरी शेतकरी बांधवांनी सदर शिबिराला उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी आणि तालुकास्तरिय शेतकरी सल्ला समिती वणी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.