पुरुषोत्तम नवघरे, वणी: पारसमल प्रेमराज फाउंडेशनच्यावतीने येथे शनिवारी (दि. 28) दुपारी 1 वाजता शेतकरी मंदिराच्या सभागृहात कीर्तनकार सोपान कणेरकर यांचे ‘युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन व पालकांची भूमिका’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले आहे. सोपान कणेरकर आपल्या प्रबोधनातून विद्यार्थी व पालकांना भागवतगीतेद्वारे आवडेल त्या भाषेत यशाचा कानमंत्र देतात. वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेसाठी हे व्याख्यान म्हणजे एक पर्वणीच असणार आहे. या जाहीर व्याख्यानाला वणी विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांनी केले.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Next Post
Comments are closed.