भरधाव पिकअपची उभ्या ट्रकला धडक, अपघातात चालकाचा मृत्यू

वागदरा गावाजवळ भीषण अपघात, नागपूर येथे उपचारासाठी नेताना मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: एका भरधाव पिकअप वाहनाने उभ्या ट्रकला जबर धडक दिली. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. बुधवार सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास वागदरा गावाजवळ हा अपघात झाला. करण चंदू पुंड (25) असे मृत चालकाचे नाव असून तो पळसोनी ता. वणी येथील रहिवासी होता. तो एका खासगी कंपनीच्या पिकअपवर चालक म्हणून नोकरी करीत होता.

बुधवारी करण हा पुनवट येथील कोलवॉशरी येथे पिकअप वाहनाने (MH 31 FC5328) साहित्य पोहोचवण्यासाठी गेला होता. संध्याकाळी साहित्य पोहोचवून तो वणीला परतत होता. हायवेवर वागदरा गावाजवळ जवळ एक कोळसा वाहतूक करणारा ट्रक (MH34 AV23650) नादुरुस्त झाल्याने उभा होता. सात वाजताच्या सुमारास भरधाव पिकअपने या उभ्या असेलेल्या ट्रकला मागून जबर धडक दिली. ही धडक इतकी जबर होती यात पिकअपची कॅबिन चेंदामेंदा झाली.

अपघात होताच रस्त्यावरील नागरिकांनी जखमी करणला गाडीतून बाहेर काढले. त्याला वणीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूर येथे पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले. मात्र तिथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. करणच्या अपघाती मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments are closed.