संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत

विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचा उपक्रम

जितेंद्र कोठारी, वणी : राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाची मागणी घेऊन संपूर्ण राज्यात एसटी कामगारांचे आंदोलन सुरु आहे. आंदोलनाला तीव्रता यावी म्हणून अनेक संघटनांकडून एस. टी. कामगारांना आर्थिक मदत पुरविण्यात येत आहे.
अशातच महावितरण क्षेत्रात अग्रगण्य असणारी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन (1029) ,विभाग पांढरकवडा यांचे वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून वणी एस.टी. आगार मध्ये आंदोलन करणाऱ्या कामगारांना 8841 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनतर्फे आर्थिक सहाय्यता लढा निधी करिता सभासदांना आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला सभासदांनी अतिशय मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. 26 नोव्हेंबर संविधान दिनाचे औचित्य साधून प्रादेशिक उपाध्यक्ष डि. एच. बिहाडे नागपूर , यवतमाळ सर्कल सहसचिव एन. बी. चिपडे, विभागीय सचिव पांढरकवडा जी.एच. चांदेकर, विभागीय संघटक पांढरकवडा एन. व्ही. राजगडकर,

जी. यु. काकडे, उपविभागीय अध्यक्ष वणी आर. एम. पाटील यांच्या हस्ते एस टी महामंडळ पदाधिकारी एस. एम. नैताम, ए. पी. कुळमेथे, सुरेश कनाके, संतोष लाटकर आणि गणेश नागभीडकर सर्व एसटी कर्मचारी यांना 8841 रोख रक्कम प्रदान करण्यात आली.

Comments are closed.