ट्रामा सेंटरमध्ये दुसरे कोविड रुग्णालय सुरू करा
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जब्बार चीनी, वणी: वणी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. परसोडा येथे तालुक्यातील कोविड केअर सेंटर आहे. मात्र रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने वणी येथे पुन्हा एक नवीन कोविड सेंटर सुरू करावे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबत त्यांनी आज शुक्रवारी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले,
वणी तालुका औद्योगिक क्षेत्र असल्याने इथे परप्रांतीय नागरिक मोठ्या प्रमाणावर करतात. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. वेळेत उपचार न मिळाल्याने काही जणांना जीवही गमवावा लागला आहे. परसोडा येथे असलेल्या एकच कोविड सेंटर मुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना असुविधेचा सामना करावा लागत आहे.
परसोडा येथे कोविड सेंटरमध्ये आरोग्यदायी स्वच्छतेच्या अभाव असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहे. या सेंटरमध्ये डॉक्टर व परिचरिकेची कमतरता असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. डॉक्टर व नर्सेसची संख्या वाढवून वणी परिसरात पुन्हा एक दुसरे शासकीय कोविड सेंटरची उभारणी करावी. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
ट्रामा सेंटरला कोविड केअर सेंटर करा
वणी ग्रामीण रुग्णालय शेजारी ट्रामा केअर सेंटर आहे. ही इमारत अद्ययावत आहे. त्यामुळे या जागी डॉक्टर व नर्सेसची भरती करून इथे कोविड केअर सेंटर तयार करावे. वणीत खासगी कोविड सेंटरची मागणी जोर धरत आहे. या ठिकाणी गरीब जनतेला ‘महात्मा फुले जण आरोग्य’ योजनेखाली मोफत मध्ये उपचार करून देण्यात यावा. अशी मागणी ही निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देते वेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शंकरराव दानव, कुमार मोहरमपुरी, दिलीप परचाके, विप्लव तेलतुंबडे व सहकारी उपस्थित होते.