अनुसुचित जाती-जमातीच्या न्यायाकरीता बौद्ध महासभेचे निवेदन

मुकुटबन पोलीस स्टेशनला निवेदन

0

सुशील ओझा, झरी: सध्या सरकारच्या धोरणांमुळे देशातील बौद्ध, अनुसूचित जाती व जमातीच्या हक्कांवर गदा येत असून यामुळे या मागास वर्गातील समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी व केंद्र व महाराष्ट्र सरकारच्या धोरणांविरोधात दि. 15 ऑगस्ट रोजी बौद्ध महासभेद्वारा मुकुटबन पोलीस स्टेशनला निवेदन सादर करण्यात आले.

एससी एसटी समाजावर होणारा सततचा अन्याय व अत्याचार, साकेत नगरी, राजगृह, चैत्यभूमी, डॉ. आनंद तेलतुंबडे, पदोन्नती मधील आरक्षण, खाजगीकरण तथा कंञाटी करण, राजर्षि शाहु महाराज शिष्यवृत्ती, डॉ. बाबासाहेब यांचा अपमान, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आरक्षण‌ अशा १० प्रकरणाबाबत निवेदन सादर करण्यता आले.

मुकुटबन पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तुकाराम नैताम यांना हे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी भारतीय बौद्ध महासभा यवतमाळ जिल्हा पूर्वचे सचिव उद्धव वाळके, भारतीय बौद्ध महासभा तालुक्याचे कोषाध्यक्ष धोंडु नगराळे, हिशेब तपासणीस विठ्ठल जिवणे, सदस्य वसंत काटकर, उत्तम मुन, स्वप्नील पथाडे, राहुन मुन, प्रियल पथाडे यांची उपस्थिती होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.