AISF तर्फे मारेगाव येथे राज्यव्यापी गर्ल्स कन्वेंशन संपन्न

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन (AISF) तर्फे मारेगाव येथे दोन दिवशीय राज्यव्यापी गर्ल्स कन्वेंशन पार पडले. पक्ष कार्यालय मारेगाव दिनांक 9 ते 10 सप्टेंबर या दिवशी हे कन्वेंशन झाले. कन्वेशनचे उद्घाटन AISF च्या माजी राज्य कौन्सिल सदस्या कॉ. लता सोनारकर (अमरावती) यांनी केले. तर मार्गदर्शक म्हणून माजी विद्यार्थी नेते कॉ. अनिल हेपट व भाकप जिल्हासचिव अनिल घाटे होते. या कन्वेंशनमध्ये राज्यभरातील 105 प्रतिनिधी सहभागी झाले होते.

कन्वेशनमध्ये AISF ची आगामी काळाची वाटचाल, विद्यार्थिनी व युवतीसमोर असलेल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक समस्या, स्रियांवर होणारे अत्याचार, लैंगिक शोषण, भेदभाव, सुरक्षितता आदी विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच AISF च्या झेंड्याखाली राज्यातील मुलींना बहुसंख्येने संघटित करून लढा उभारण्याचे ठरले.

यावेळी 11 सदस्यांची गर्ल्स कमेटी निवडण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य गर्ल्स कन्वेनर म्हणून कॉ. मिनाक्षी मेहेर (भंडारा), को-कन्वेनर म्हणून कॉ. प्रतीक्षा ढोके (अमरावती), कॉ. खुशी ढंग (कोल्हापूर), व्हॅकंट(यवतमाळ) यांची निवड करण्यात आली.

AISF राष्ट्रिय गर्ल्स कमिटी सदस्य तसेच AISF राज्य सहसचिव कॉ. प्राजक्ता कापडणे, AISF राष्ट्रिय गर्ल्स कमिटी सदस्य कॉ. उज्ज्वला कांबळे, AISF महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कॉ. नीलम जगताप, कॉ. मिनाक्षी मेहेर, कॉ. प्रतीक्षा ढोके यांच्या अध्यक्ष मंडळात सदर कन्वेंशन चालले.

कार्यक्रमाला प्रा. धनंजय आंबटकर, बंडु गोलर, AISF राज्याध्यक्ष विराज देवांग(नाशिक), राज्य सचिव वैभव चोपकर (भंडारा), राज्य सहसचिव प्राजक्ता कापडणे, राज्य उपाध्यक्ष प्रसाद गोरे (परभणी), नीलम जगताप(कोल्हापुर), अमीर काजी(मुंबई) यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन उज्ज्वला कांबळे हिने केले तर उपस्थितांचे आभार प्राजक्ता कापडणे हिने मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी AISF जिल्हा निमंत्रक अथर्व निवडींग, दिनेश अंड्रस्कर यांच्या नेतृत्त्वात एआयएसएफच्या सदस्यांनी परिश्रण घेतले.

Comments are closed.