बँक व पोस्ट ऑफिस कडून वीजबिल स्वीकारणे बंद

● वीजबिल भरण्याचे ठिकाण नसल्याने ग्राहक त्रस्त

0

सुशील ओझा, झरी: महावितरणने वीजबिल स्वीकारण्याची जवाबदारी आधी मध्यवर्ती बँक आणि पोस्ट ऑफिस यांना दिली होती. त्यानंतर ती जबाबदारी राजलक्ष्मी बँक यांना दिली. मात्र या बँकेने सुद्धा बिल स्वीकारण्यास नकार दिला आहे. ज्यामुळे हजारो महावितरण ग्राहकांना वीजबिल भरण्याकरिता भटकावे लागत आहे. वीजबिल भरण्याचे ठिकाणे बंद झाल्याने जनतेने बिल भरायचे कुठे? हा प्रश्न जनते समोर उभा आहे.

तालुक्यातील मुकुटबन तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून इथे विविध कार्यालय, बँक, शाळा, महाविद्यालय असून परिसरातील ५० ते ६० गावाचा संपर्क वेगवेगळ्या कामानिमित्त येतो. मुकुटबन य़ेथे महावितरण कंपनी अंतर्गत वीज वितरण कंपनीचे हजारो ग्राहक आहेत.

नियमाने वीजग्राहकाने ऑनलाईन वीजबिल भरायची व्यवस्था वीज वितरण कंपनीने केली आहे. तालुक्यात अशिक्षित गोरगरीब जनतेला ऑनलाईन प्रक्रिया समजत नसल्यानेही मोठी अडचण निर्माण होत आहे. महावितरण कंपनीने गरीब व अशिक्षित जनतेचा विचार करून मुकुटबन येथे वीजबिल भरण्याची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.