कंपनीच्या टिनाचे शेड कोसळून मजूर महिलेचा मृत्यू, सात जखमी

वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसाचा भीषण कहर, जनजीवनही प्रभावित

बहुगुणी डेस्क, वणी: वणीसह झरी परिसरातही दमदार पावसानं हजेरी लावली. त्यात बुधवार 25 जूनला रात्री 9 वाजताच्या सुमारास झरी तालुक्याला जबर हादरा दिला. वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे झरी तालुक्यातील गणेशपूरला एक मोठी आपत्ती ओढवली. येथील एका कंपनीच्या टिनाचे शेड कोसळले. त्याखाली एका मजूर महिलेचा दुदैवी मृत्यू झाला. तर सात मजूर जखमी झालेत. मुळात छत्तीसगडच्या राजनांदगावमधील पेरीटोला येथील गंगा सुगवीर कंवर (20) असे या मृत महिलेचे नाव आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

डी-लाईट केमिकल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी झरी तालुक्यातील गणेशपूर ग्रामपंचायत हद्दीत आहे. ती व्हाईट वॉश पावडरचं उत्पादन करते. बुधवार 25 जूनला रात्री 9 वाजताच्या सुमारास कंपनीत अनेक मजूर काम करत होते. वेगवान वाऱ्यांसह पाऊस बरसायला लागला. या वादळी पावसानं कंपनी परिसरातील टिनाचे शेड कोसळले. नेमके त्यावेळी कंपनीतील टिनाच्या शेडमध्ये व्हाईट वॉश पावडरच्या पॅकिंगचे काम सुरु होते. यातील गंगा सुगवीर कंवर ही महिला त्या टिनेच्या शेडखाली दबली. त्यात तिचा मृत्यू झाला. त्याच वेळी सात मजूरही या घटनेत जखमी झालेत. त्यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.

गणेशपूर येथील डी-लाईट केमिकल कंपनीत चुनखडी (डोलोमाईट) पासून व्हाईट वॉश पावडर तयार करून त्याची राज्यात व राज्याबाहेर विक्री केली जाते. या कंपनीत शेकडो मजूर काम करतात. २५ जूनला रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला. त्यावेळी वादळ वारा व मुसळधार पावसामुळे टिनाचे शेड कोसळले. यात गंगा सुगवीर कंवर या मजूर महिलेचा मृत्यू झाला. तर इतर सात मजूर जखमी झाले आहेत. त्यापैकी मीना आत्राम (४५) रा. मोहदा ता. वणी या महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. इतर जखमी मजुरांमध्ये तीन पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे.

Comments are closed.