खूशखबर! आता चिखलगावात 33 के.व्ही. वीजवाहिनी कार्यान्वित
विद्युत विभागाच्या उपकार्यकारी अभियंता यांच्या प्रयत्नांना आले यश:
विवेक तोटेवार , वणी: तालुक्यातील चिखलगाव येथे गेल्या अनेक वर्षापासून विजेची समस्या होती. व्होल्टेज नसल्याने उन्हाळ्यात कूलर व अन्य उपकरणे चालणे कठीण झाले होते. त्यातच कमी व्होल्टेजमुळे विद्युत उपकरणांमध्ये नेहमीच बिघाड होत होता. परंतु वणी शहरातील उपकार्यकारी अभियंता यांच्या प्रयत्नांमुळे आता चिखलगाव येथे 33 के व्ही वीज वाहिनी सुरू झाली. त्यामुळे चिखलगाववासीयांच्या विजेच्या समस्या सुटल्याची चिन्ह दिसत आहेत.
सन 2018मध्ये वणी शहरासाठी 33/11 के व्ही चिखलगाव उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले. परंतु 220 के व्ही उपकेंद्र वणी येथे 33 के. व्ही. चिखलगाव फीडरसाठी bay नसल्यामुळे 33/11 चिखलगाव उपकेंद्र 33 के. व्ही. राजूर फीडरवरून कार्यान्वित करण्यात आहे होते .
त्यानंतर वर्ष 2024 मध्ये उपकार्यकारी अभियंता यांच्या पाठपुराव्याने 220 उपकेंद्र वणी येथे 33 के व्ही चिखलगाव साठी bay कार्यान्वित करण्यात आला. 33 के व्ही चिखलगाव फीडर वरील वर्ष 2018 ते 2024 मध्ये 20 ते 25 पोल उभे करून फीडरसुद्धा कार्यान्वित करण्यात आले.
13 जून रोजी अधीक्षक अभियंता , यवतमाळ, कार्यकारी अभियंता , पांढरकवडा उपकार्यकारी अभियंता वणी आणि सहाय्यक अभियंता वणी शहर क्र. 2 यांच्या समवेत 330 के व्ही चिखलगाव फीडर कार्यान्वित करण्यात आले. या अगोदर सदरहू विद्युत भार हा 33 के व्ही राजूर फीडर वर होते. म्हणजे 33 के व्ही राजूर फीडर वर 33/11 के व्ही राजूर , चिखलगाव, मारेगाव , मार्डी उपकेंद्र आणि वेकोली राजूर उपकेंद्र असे होते .
33 के व्ही चिखलगाव फीडर कार्यान्वित झाल्यामुळे 33 के व्ही राजूर फीडर वरील 33/11 के व्ही चिखलगाव उपकेंद्र सोबत वरील नमूद दोन कोल वॉशरीज चा विद्युत भार हा 33 के व्ही चिखलगाव फीडर वर टाकण्यात आला. 33 के व्ही राजूर फीडर वर 33/11 के व्ही राजूर उपकेंद्र , वेकोली राजूर उपकेंद्र , मारेगाव आणि मार्डी उपकेंद्र असे अधीक्षक अभियंता यांच्या उपस्थितीत टाकण्यात आला. विजेबाबत कोणतीही तक्रार अर्बन 1 म्हणजे टोल टॅक्स जवळील विद्युत केंद्र येथील मोबाईल क्रमांकावर 9423947919 संपर्क साधावा. तसेच अर्बन 2 म्हणजे नांदेपेरा रोडवरील विद्युत कार्यालय मोबाईल क्रमांक 9423948017 संपर्क साधावा.असे आवाहन उपकार्यकारी अभियंता जयंत एकरे यांच्याद्वारे करण्यात आले आहे.



Comments are closed.