मॅकरून स्टुडंट्स अकॅडमीत नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

शाळेतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती

0

विवेक तोटेवार, वणी: आज शनिवार दिनांक 23 जानेवारी रोजी मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी (CBSC) येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभना यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला हार अर्पण अभिवादन करण्यात आले .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका शोभना होत्या. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक सुवर्णपान आहे. त्यांचे योगदान आणि कार्य सदैव प्रेरणादायी राहील. आजही त्यांची केवळ जयंती साजरी केली जाते. त्यांची पुण्यतिथी मानली जात नाही. हे केवळ त्यांच्यावर असलेल्या प्रेमामुळेच.

यावेळी शाळेचे सर्व शिक्षक वृंद, शाळेचे वरिष्ठ लेखापाल माया तराडे, माया गिरी व कर्मचारी वर्ग यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनी कुरील यांनी केले. सरतेशेवटी सुभाषचंद्र बोस यांचा ऐतिहासिक नारा “तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा”  या नाऱ्यांने कार्यक्रमाची सांगता झाली.

हे देखील वाचा:

मोहुर्ली येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

साप चावल्याने गणेशपूर (खडकी) येथील युवकाचा मृत्यू

Leave A Reply

Your email address will not be published.