या मुलींनी उभं केलं नवं विश्व, पटकावला बहुमान

जिल्हास्तरीय ऑनलाईन बालकवी संमेलनात झळकलेत विद्यार्थी

0

जब्बार चीनी, वणी: जिल्हास्तरीय ऑनलाईन बालकवी संमेलनात कायर येथील जि .प .शाळेच्या विद्यार्थीनींनी बाजी मारली. यात वर्षा राकेश शंकावार हिचा प्रथम चंचल झोडे हिचा द्वितीय क्रमांक आला. ‘माझी कविता, माझे विश्व ‘ ही जिल्हास्तरीय बाल काव्यलेखन स्पर्धा झाली. या दोघींनी आपल्या लेखणीतून नवं विश्व उभं करीत या दोघींनी बहुमान पटकविला.

या स्पर्धेत सुमारे 450 बालकवींनी सहभाग घेतला. त्या बालकवींना प्रत्यक्ष आपली काव्यप्रतिभा सादरीकरण करण्याची संधी ऑनलाईन बालकवी संमेलनात देण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अरविंद झलके ( जिल्हाध्यक्ष अमसिशाप, यवतमाळ) तसेच संमेलाध्यक्ष किशोर तळोकार( कवि साहित्यिक, अमरावती ) होते.

दि 8 डिसेंबर रोजी त्यांचा उपस्थित विद्यार्थ्यांचे काव्य ऑनलाईन सादर करण्यात आले. यात प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यामधून वणी तालुक्यातील जि.प .शाळा कायर येथील वर्षा राकेश शंकावार हिने वर्ग 6 ते 8 गटातून प्रथम क्रमांक तर चंचल मनोज झोडे हिने वर्ग 1ते 5 या गटातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. याच स्पर्धेत लालगुडा येथील चवथ्या वर्गातील अर्पित कैलास चाफले याने प्रथम तर कृतिका प्रदीप कांबळे हिने दुसरा क्रमांक पटकावला.

वर्षा आणि चंचल यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक कुमुदिनी देवतळे व कायर येथील मुख्यध्यापक शेखन्ना भिंगेवार, शेकन्ना भिंगेवार, मुख्याध्यापिका रंजना तुपे तथा सर्व शिक्षकवृंद यांना दिले.

हेदेखील वाचा

बुधवारी तालुक्यात 4 पॉजिटिव्ह

हेदेखील वाचा

खातेरा येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग

 

Leave A Reply

Your email address will not be published.