सराव स्पर्धा परीक्षेचे यशस्वी आयोजन

एनबीएसए कॉलेजमध्ये पार पडली स्पर्धा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ग्रामीण तसेच शहरी भागातील मोठ्या संख्येने विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. त्यांच्या परीक्षेचा सराव म्हणून शहरातील एनबीएसए महाविद्यालयात सराव स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले. छ. शिवाजी महाराज जयंती निमित्त रविवारी दिनांक 12 फेब्रुवारी रोजी ही परीक्षा घेण्यात आली. वणीतील रॉयल फाउंडेशन तसेच शिवचरण प्रतिष्ठान यांच्या आयोजनातून आयकॅन करिअर अकॅडमी, कृष्णा मास्टर्स अकॅडमी, उड्डाण फिजिकल करिअर अकॅडमी यांच्या सहकार्यातून ही स्पर्धा घेण्यात आली.

यावेळी वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप शिरसकर आणि नूरजहाँ बेगम सलाम अहमद महाविद्यालयाच्या सचिव डॉ. राणानूर सिद्धिकी यांनी भेट दिली. ऍड. नीलेश चौधरी, प्राचार्य डॉ. रोहित वनकर यांच्या मार्गदर्शनात ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धा परीक्षेचे नियोजन आयकॅन करिअर अकॅडमीचे सोपान लाड, कृष्णा मास्टर्स अकॅडमीचे नीलेश निवलकर, उडान फिजिकल करिअर अकॅडमीचे गणेश आसुटकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवचरण प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल झट्टे, सचिव ललित कचवे, उपाध्यक्ष निखिल तुराणकर, तुषार बल्की, संतोष लाभशेट्टीवार, योगेश आवारी, हितेश गोडे, गौरव दोडके, साहिल पारखी,पवन बुऱ्हान, राजू चौधरी, सचिन भेंडाळे, दुष्यंत वासेकर, नीरज धावंजेवार, अभिजीत येरणे, अमित गायकवाड, पवन उरकुंडे, चेतन कवरासे, राजुभाऊ गव्हाणे, प्रज्वल चौधरी, स्वप्निल हिवरकर यांनी परिश्रम घेतले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.