ज्येष्ठ संपादक बाळ कुळकर्णी 16 फेब्रुवारीला वणीत

पत्रकार प्रशिक्षण शिबिरात राहणार मुख्य मार्गदर्शक

बहुगुणी डेस्क, वणी: गुरुवारी दिनांक 16 फेब्रुवारी रोजी वणीतील वसंत जिनिंग येथे पत्रकारिता कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 10 ते दु. 5 या वेळेत ही कार्यशाळा होणार असून या कार्यशाळेत ज्येष्ठ संपादक बाळ कुळकर्णी (नागपूर) हे मुख्य मार्गदर्शक म्हणून राहणार आहे. यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार दिनेश गंधे (यवतमाळ) व मीडियातील विविध क्षेत्रातील मान्यवर शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पत्रकारिता क्षेत्रात येऊ इच्छिणारे, हौशी पत्रकार, पत्रकारिता समजून घेण्याची इच्छा असणारी 18 वर्षांवरील व्यक्ती या कार्यशाळेत सहभागी होऊ शकते. स्माईल फाउंडेशनतर्फे व वणी बहुगुणी यांच्या सहकार्यातून सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात केवळ 70 जागा असून यातील 20 जागा या महिलांसाठी राखीव राहणार आहेत. कार्यशाळा नि:शुल्क असून यासाठी नोंदणी करणे गरजेचे आहे. या शिबिरात वणी, मारेगाव, झरी व परिसरातील व्यक्तींनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्माईल फाउंडेशनचे सागर जाधव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी 9096133400 या क्रमांकवर संपर्क साधण्याचे आवहन करण्यात आले आहे.

काय शिकता येणार पत्रकारिता कार्यशाळेत?
सदर शिबिर हे दोन सत्रात होणार असून पहिल्या सत्रात पत्रकारितेची ओळख, बातमी म्हणजे काय ? बातमीमुल्य म्हणजे काय? पत्रकारातील गुणवत्ता, बातमी लेखन, बातमी लिहिण्याचे विविध प्रकार, बातमी लिखानाचे तत्व, विविध विषयाच्या बातम्या कशा लिहाव्यात? यासह प्रेस नोट लिखान, पत्रकार परिषद, भाषण-व्याख्यान बातमी, विश्लेषणात्मक बातमी, बातमीची भाषा इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

दुस-या सत्रात फिल्ड रिपोर्टिंग, मॉडर्न मीडिया, मोबाईल जर्नालिज्म, डिजिटल मीडिया (पोर्टल, यूट्यूब चॅनल), रेव्हेन्यू मॉडेल, मीडिया लॉ आणि एथिक्स यासह शिबिरार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले जाणार आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी 9096133400 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

ज्येष्ठ संपादक व विचारवंत बाळ कुळकर्णी हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. विविध प्रतिष्ठीत वृत्तपत्रात त्यांनी संपादक म्हणून कार्य केले आहे. याशिवाय ते गेल्या अनेक वर्षांपासून ते कार्यशाळेद्वारा नवोदित पत्रकार व पत्रकारांना मार्गदर्शन करीत आहे. ज्येष्ठ पत्रकार दिनेश गंधे हे देखील 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे.

Comments are closed.