वाढदिवसाच्या दिवशीच विवाहित तरुणाची आत्महत्या

गळफास घेऊन संपवले जीवन, परिसरात हळहळ

बहुगुणी डेस्क, मारेगाव: वाढदिवसाच्या दिवशीच एका 34 वर्षीय विवाहित युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
नवीन मोतीगिरी बावणे (34) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे मारेगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. वाढदिवसाच्या दिवशीच नवीनने हे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

नवीन हा मुळचा मारेगाव तालुक्यातील टाकळखेडा येथील रहिवासी होता. तो पत्नी व दोन मुलीसह मारेगाव येथे राहत होता. तो काही काळ नागपूर येथे काम करीत होता. मात्र एक महिन्याआधीच तो मारेगाव येथे शिफ्ट झाला होता. शहरातील एका मनोरंजन क्लबमध्ये तो काम करीत होता. रविवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास त्याने क्लबमधील खोलीत दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

काही वेळाने ही घटना उघडकीस आली. रविवारीच नवीनचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशीच त्याने आत्महत्या केल्याने या घटनेमुळे खळबळ उडाली. नवीनच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. त्याच्या मागे आई, पत्नी व दोन वर्षांची मुलगी आहे. पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

अश्लिल फोटो तयार करून व्हायरल करण्याची धमकी

Comments are closed.