सुधीर मुनगंटीवार यांच्या उमेदवारीचा वणीत जल्लोष
यावेळी विजय हिसकावून आणणार - आ. संजीवरेड्डी बोदकुरवार
विवेक तोटेवार, वणी: राज्याचे वन, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर- आर्णी-वणी लोकसभा क्षेत्राची उमेदवारी 13 मार्च रोजी जाहीर करण्यात आली. गेल्या लोकसभेत भाजपच्या हातून ही सिट गेली होती. आता या जागेसाठी भाजपतर्फे सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी बहाल केल्याने वणीतील छत्रपति शिवाजी महाराज चौक येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी ही जागा काँग्रेसच्या हातून हिसकावून आणणार, असा विश्वास व्यक्त केला.
लोकसभेचे बिगुल वाजताच उमेदवारी मिळविण्यासाठी प्रचंड रस्सीखेच सुरू झाली आहे. उमेदवारीसाठी हंसराज अहिर, सुधीर मुनगंटीवार, डॉ. अशोक जीवतोडे यांची चर्चा होती. परंतु शेवटी उमेदवारीची माळ सुधीर मुनगंटीवार यांच्या गळ्यात पडली. त्यामुळे आज गुरुवारी दिनांक 14 मार्च रोजी शिवतिर्थावर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्त्वात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडत व मिठाई वाटत जल्लोष केला.
यावेळी विजय हिसकावणार – आ. बोदकुरवार
एक धडाकेबाज नेता व विकास पुरुषाला उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या वेळी थोड्या फार फरकाने भाजपचा पराभव झाला होता. मात्र यावेळी काँग्रेसच्या हातात असलेली एकमेव सीट देखील हिसकवणार. गेल्या पाच वर्षात केंद्राच्या अधिनस्त असलेले अनेक विषय रखडले होते. यावेळी सुधीर मुनगंटीवार ते पूर्ण करणार.
– आ. संजीवरेड्डी बोदकुरवार
भाजपने यावेळी अबकी बार 400 पारचा नारा दिला आहे. त्यामुळे यावेळी भाजप कोणतीही जोखीम घेण्यास इच्छुक नाही. तसेच मतदारांचा कौल, राजनीतिक प्राबल्य, सर्वांच्या ओळखीच्या चेहरा लोकसभेच्या रिंगणात उतरविणे गरजेचे होते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी बहाल केल्याचे बोलले जात आहे.
यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, रवी बेलूरकर, विजय पिदूरकर, संजय पिंपळशेंडे, गजानन विधाते, चंद्रकांत फेरवाणी, संतोष डंभारे, शुभम गोरे, आशिष डंभारे यांच्या महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.