मोदी सरकार लोकांच्या हितासाठी प्रामाणिक – सुधीर मुनगंटीवार

मुनगंटीवारांचा काँग्रेसवर विविध प्रश्नांवर घाणाघात

विवेक तोटेवार, वणी: कार्यकते हे कुण्या व्यक्तीचे नाही तर पक्षाचे असतात. ते पक्षासाठी काम करतात. सर्वसामान्यांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महागाई, बेरोजगारी इत्यादी विषयावर मोदी सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच विश्वास टाकणार, असा आशावाद चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. वणीच्या विनायक मंगल कार्यालयात 21 मार्च रोजी दुपारी पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी विविध विषयावर मुक्तपणे संवाद साधला.

संविधानाच्या अमृत महोत्सवाचे वर्ष आहे. त्यामुळे हे महत्वाचे वर्ष आहे. काँग्रेसच्या विकासाचा वेग फार कमी होता. तर मोदी सरकारची दिर्घदृष्टी, दूरदृष्टी व द्विव्यदृष्टीमुळे विकासाचा वेग वाढला आहे. कांग्रेसने 47 वर्ष केंद्रात व महाराष्ट्रात बराच काळ सत्ता उपभोगली. तेव्हा शरद पवार कृषिमंत्री होते तरी राज्यात शेतकरी आत्महत्या सुरुच होत्या.

जर काँग्रेस शेतकरी आत्महत्येचा प्रश्न उचलत असेल तर त्यांना मतदारांनी का निवडून द्यावे. त्यांची सरकार सत्तेत असतानाही आत्महत्या होतच होत्या. इतक्या कमी वर्षात भाजप सरकारने 6 हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले. युरिया खतांचा साठवणुकीवर अंकुश लावला त्यानी 1 रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी मोदी सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.

आपणास लोकसभेची तिकीट मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांचा एक गट नाराज असल्याचे बोलके जात आहे. यावर त्यांनी कार्यकर्ते हे पक्षाचे असतात व्यक्तीचे नाही, असे उत्तर दिले. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार अशोक उईके, तारेंद्र बोर्डे, विजय पिदूरकर, संजय पिंपळशेंडे, रवी बेलूरकर मंचावर उपस्थित होते.

Comments are closed.