वागदरा येथे इसमाची घरी गळफास घेऊन आत्महत्या

मृतक हा मजुरी काम करायचा. त्याने दुपारी घरी कुणी नसताना.....

बहुगुणी डेस्क, वणी: शहरापासून जवळ असलेल्या वागदरा येथे एका इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी दु. 12 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. राजू ठाकरे (वय अंदाजे 45) असे मृतकाचे नाव आहे. मारेगाव नंतर आता वणी तालुक्यातही सातत्याने आत्महत्येच्या घडत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

प्राप्त माहिती नुसार, राजू ठाकरे हा वागदरा येथील रहिवासी होता. तो त्याच्या कुटुंबीयांसह राहायचा. तो एका ट्रॅक्टरवर मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. सोमवारी दिनांक 3 मार्च रोजी दुपारच्या सुमारास त्याची पत्नी घराबाहेर गेली होती. तर मुलगा कामाला गेला होता. घरी कुणी नसल्याची संधी साधून राजूने घराच्या आड्याला गळफास लावून आत्महत्या केली. दु. 12 वाजताच्या सुमारास त्याची पत्नी घरी आल्यावर ही घटना उघडकीस आली. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी याची माहिती शेजा-यांना तसेच मुलाला दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

घटनेची माहिती वणी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला तसेच मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. नैराश्यात त्याने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली व एक मुलगा असा आप्त परिवार आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.  

Comments are closed.