गोठ्यात गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

कोलार पिंपरी येथील घटना

जितेंद्र कोठारी, वणी: तालक्यातील कोलार पिंपरी येथे एका तरुणाने गोठ्यात गळफास घेऊन आपले जीवन संपवले. अनिरुद्ध प्रकाश बोंडे (21) असे मृतकाचे नाव आहे. तो पिंपरी (कोलार) येथील रहिवासी होता. तो त्याच्या आई व भावासोबत राहायचा व दूध विक्रीचा व्यवसाय करायचा. आज मंगळवारी सकाळी घरातील सदस्य उठले असता त्यांना अनिरुद्ध घरात आढळून आला नाही. त्यांनी गावात शोधाशोध केला मात्र त्यांना तो आढळून आला नाही. दरम्यान गोठ्यामध्ये त्यांना अनिरुद्ध गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत मृतकाचे काका गजानन बोंडे यांच्या तक्रारीवरून वणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

वसंत जिनिंगचे अस्तित्व टिकवण्यासाठी जय सहकार पॅनलला बहुमताने निवडून द्या – ऍड. देविदास काळे

बुकिंगसाठी पोस्टरवर क्लिक करा...

Comments are closed.