सलग दोन आत्महत्येने हादरले शास्त्रीनगर

मंगळवारी 20 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: शहरातील शास्त्रीनगर भागात राहणाऱ्या एका तरुणाने मंगळवारी दिनांक 12 डिसेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अनिकेत विजय आवारी (20), रा. शास्त्रीनगर वणी असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे याच भागात 3 दिवसांआधी एका विवाहित तरुणीने आत्महत्या केली होती.

Podar School 2025

मृत अनिकेत हा आपल्या आईसोबत शहरातील शास्त्रीनगर येथे राहत होता. अनिकेतची आई ही मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायची. आईला हातभार म्हणून अनिकेत हा रंगरंगोटीचे काम करीत होता. मंगळवार अनिकेतने घरातील पंख्याला गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. रात्री 9 वाजताच्या सुमारास अनिकेतची आई घरी आली असता ही घटना उघडकीस आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सलग दोन आत्महत्येने शास्त्रीनगर हादरले
शास्त्रीनगर परिसरात शनिवारी एका 20 वर्षीय विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर तीनच दिवसांनी मंगळवारी अनिकेत ने आत्महत्या केली. एकाच परिसरात सलग दोन आत्महत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून यामुळे शास्त्रीनगर हादरून गेले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. अनिकेतने हे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.