आणखी एक आत्महत्या, MIDC परिसरात आढळला मृतदेह

नांदेपेरा येथील विवाहित तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील नांदेपेरा येथे राहणाऱ्या एका तरुणाने मंगळवारी रात्रीच्या सुमारास वणीजवळ भालर रस्त्याजवळील हनुमान मंदिराजवळ आत्महत्या केली. ही बाब बुधवारी सकाळी काही ये-जा करणाऱ्या लोकांच्या लक्षात आल्याने उघड झाली. मंगेश प्रभाकर डोंगे (अंदाजे 32) असे मृत तरुणाचे नाव असून तो विवाहित होता. मंगेश असे पाऊल उचलेले अशी कुणालाच कल्पना नव्हती त्यामुळे त्याचा मित्रपरिवार, कुटुंबीय, परिचित हादरून गेले आहे.

मंगेश हा नांदेपेरा येथील रहिवासी होता. तो घरची शेती सांभाळायचा. तसेच त्याचा गाडीचा देखील व्यवसाय होता. गेल्या वर्षीच त्याचा विवाह झाला होता. मंगळवारी तो नांदेपे-याहून वणीला आला होता. आज बुधवारी दिनांक 20 मार्च रोजी भालर एमआयडीसी परिसरातील हनुमान मंदिराजवळ एक इसम पडून असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली असता त्यांना एका तरुणाने विष प्राशन केल्याचे प्राथमिक तपासात आढळले. तसेच मृतदेहाची ओळख पडून तो नांदेपेरा येथील मंगेश प्रभाकर डोंगे असल्याची माहिती त्यांना मिळाली. मंगेश हा सधन घरचा होता. घरची शेती तो सांभाळायचा. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह वणीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला असून प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

 

Comments are closed.