विवेक तोटेवार, वणी: वणीतील एमआयडीसी परिसरात एका विवाहित इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. वामन दिगांबर बुरचुंडे (42) असे मृताचे नाव आहे. तो जुना लालगुडा येथील रहिवासी होता. तो गवंडी काम करायचा. दुपारच्या सुमारास एमआयडीसी परिसरात असलेल्या क्वार्टरजवळील मैदानातील एका झाडाला तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. काही नागरिकांना हे दृष्य दिसताच त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. काही लोकांनी सदर इसम हा वामन असल्याचे ओळखले त्यामुळे त्यांनी याची माहिती वामनच्या कुटुंबीयांना दिली. वामनने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. वामनच्या पश्चात पत्नी, मुलगा असा आप्त परिवार आहे.
Comments are closed.