विवेक तोटेवार, वणी: मारेगाव तालुक्यातील केगाव येथील आत्महत्येच्या बातमीची शाई वाळते न वाळते, तोच पुन्हा दुसरी आत्महत्या झाली. तालुक्यातील नवरगाव धरण येथील कपिल रवींद्र परचाके (26) याने आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तालुक्यातील या सलग दुसऱ्या आत्महत्येमुळे प्रचंड हादरा बसला.
कपिलसह संपूर्ण कुटुंब मूलमजुरी करायचे. गेल्या काही दिवसांपासून कपिल कामावर जात नव्हता. तो नेहमी घरीच असायचा. नेहमीप्रमाणेच मंगळवारीदेखील कुटुंबातील सर्व सदस्य कामावर गेलेत. कपिल मात्र घरीच होता. सायंकाळच्या सुमारास कपिलचा मोठा भाऊ घरी परत आला.
त्याला कपिलचा गळफास घेतलेला मृतदेह दिसला. कपिलने आपली जीवनयात्रा का संपवली याचे कारण अद्याप कळले नाही. कपिलच्या पश्चात आई-वडील आणि दोघे भाऊ आहेत. या घटनेमुळे मारेगाव तालुक्यासह सर्वत्र शोककळा पसरली आहे.
Comments are closed.