डॉ. लोढा यांच्या प्रयत्नातून माणकी पांदण रस्त्याचे काम पूर्ण
चार दिवसांमध्ये लोकसहभागातून रस्ता तयार
विवेक तोटेवार, वणी; स्वातंत्र्यपूर्व काळापासून अजुन पर्यंत ज्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. अनेक निवेदने, अर्ज सत्ताधाऱ्यांकडे देऊनही जी मागणी पूर्ण केल्या गेली नाही. ते काम राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डॉ लोढा यांनी अवघ्या 4 दिवसात पूर्ण करून दाखवले आहे. सदर व्यथा ही वणी तालुक्यातील सुकनेगाव इथली आहे. सुकणेगावातून माणकी इथे जाण्यासाठी रस्ता नव्हता. ही समस्या डॉ लोढा यांना गावकर्यांनी सांगितली. डॉ लोढा यांनी रस्त्याची पाहणी केली. लोकसहभागातून सदर पांदण रस्ता खडीकरण करून बांधून पूर्ण केला. रविवारी संध्याकाळी सदर रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले.
सुकनेगाव गावातून माणकी पांदण रस्त्यावर अनेक शेतकऱ्यांचे शेत आहेत. पावसाच्या महिन्यात गुडघाभर चिखलातून मार्ग काढत त्यांना शेतात जावे लागते. शिवाय बैलबंडीही जात नाही. ही समस्या सोडविण्याकरिता सुकणेगाव ग्रामवासीयांनी अनेकदा सत्ताधारी, तहसीलदार यांच्याकडे अर्ज, विनंत्या व निवेदने दिलीत. परंतु त्यांच्या विनंती अर्जाला केराची टोपलीच दाखविण्यात आली. 10 जून रोजी काही गावकऱ्यांनी डॉ लोढा यांना सदर समस्या सांगितली. डॉ लोढा यांनी सदर समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. व त्वरित 11 जून रोजी गावकऱ्यांच्या सहभाग व डॉ लोढा यांच्या आर्थिक मदतीतून मंगलीचा रस्ता अवघ्या 4 दिवसांमध्ये म्हणजे 14 जून रोजी बांधून पूर्ण केला.
रविवारी 17 जून रोजी डॉ लोढा व समस्त ग्रामवासी रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्याला हजर होते. यावेळी डॉ लोढा यांची बँडच्या तालावर वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकित शेकडोच्या संख्येने गावकरी, महिला, युवा वर्ग उपस्थित होते. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पणनं करण्यात आले. त्यानंतर डॉ लोढा यांच्या स्वागतासाठी कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ लोढा, जयसिंग गोहोकार, महेश पिदूरकर, स्वप्नील धुर्वे, राजू उपरकर, सूर्यकांत खाडे, संजय जंबे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रवीण झाडे यांनी केले. कार्यक्रमात रा. काँचे ज्येष्ठ नेते जयसिंग गोहोकार व झरी तालुक्याचे रा. कॉ. चे संजय दंभे यांनी आपले मत प्रकट केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. लोढा म्हणाले की….
आज माझ्या जीवनातील अत्यंत आनंदाचा क्षण आहे. गावकाऱ्यांसाठी जरी रस्ता बनला असला तरी मलाही याचा आनंद होत आहे. ज्याप्रमाणे एखाद्या रोगावर डॉ उपचार करतो तो रोग बरा झाल्यानंतर रोग्याला जितका आनंद होतो तितकाच आनंद डॉक्टरलाही होतो. त्याचप्रमाणे ही अवस्था आहे. सुकनेगावची ओळख वणी तालुक्यातील एक श्रीमंत गाव म्हणून आहे. परंतु गावात सुधारणा मात्र शून्य आहे. गावात कमालीची अस्वच्छता आहे. धडधाकट शरीर असणे म्हणजे स्वास्थ नव्हे. तर आतून शरीर स्वस्थ असणे आवश्यक आहे. त्याकरिता गावात स्वच्छता असणे आवश्यक आहे. मंगळी पांदण रस्ता जो बांधून पूर्ण झाला आहे त्याचे संपूर्ण श्रेय गावातील युवा पिढीला जाते.