सिद्धार्थ वसतिगृहातर्फे सुमीत रामटेके यांचा सत्कार

संविधानाची प्रत व पुष्पगुच्छ देऊन केला सन्मान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सर्वसामान्य कुटुंब व शिरपूरसारख्या ग्रामीण भागातून आलेला सुमीत रामटेके यांनी उत्तुंग भरारी घेत यूपीएससी परीक्षेत यश मिळवले. या यशाबद्दल वणीतील सिद्धार्थ वसतिगृहातर्फे सुमीत यांचा संविधानाची प्रत व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी वसतिग्रुहाचे अध्यक्ष प्रा. पुरूषोत्तम पाटील, उपाध्यक्ष एस.एस.सोनारखण, सचिव नवनाथ नगराळे, कोषाध्यक्ष जगदीश भगत, सिध्दार्थ सोनारखण व सुमीतचे आई वडील उपस्थित होते. यावेळी सुमीत यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

नुकत्याच लागलेल्या यूपीएससीच्या परीक्षेत सुमीतने ऑल इंडिया 358 रँक मिळवली. सहज आयएएस मिळत असतानाही त्यांनी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने आयपीएस घेतले. निकाल लागल्यानंतर सुमीत आपल्या गावी पोहोचला आहे. सध्या त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सुमीत सुधाकर रामटेके हा एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आहे. वडील सुधाकर रामटेके हे शिरपूर येथील गुरुदेव शाळेत परिचारक तर आई ज्योत्स्ना रामटेके या गृहिणी. सुमीतचे प्राथमिक शिक्षण शिरपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. या आधी सुमीतची सशस्त्र पोलीस बळ विभागात असिस्टंट कमांडन्ट पदी निवड झाली होती. सध्या सुमीत हे केंद्र सरकारच्या कार्पोरेट कार्य मंत्रालयाअंतर्गत नवी दिल्लीतील इंडियन कॉर्पोरेट लॉ विभागात असी. डिरेक्टर या पदावर रुजू आहेत.

Comments are closed.