सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रा. सुनील पवार यांच्या संशोधनाला पेटंट

लिपोसोमल ड्रग डिलिव्हरी उपकरणाच्या संशोधनासाठी मिळाले पेटंट

बहुगुणी डेस्क, वणी: फार्मसीचे प्राचार्य सुनील पवार यांना भारतीय पेटंट कार्यालयाकडून नुकतेच पेटंट प्रदान करण्यात आले आहे. ‘लिपोसोमल ड्रग डिलिव्हरसाठी उपकरण’ हा त्यांचा पेटंट आहे. हे उपकरण विशिष्ट पेशी किंवा उतींना लक्ष्यित करते, औषध वितरणाची कार्यक्षमता सुधारते, त्यांच्या प्रकाशनावर नियंत्रण ठेवते आणि औषध लोडिंग सामग्रीला स्थिरता देते.

काय आहे लिपोसोमल ड्रग डिलिव्हरी
लिपोसोमल ड्रग डिलिव्हरी सिस्टिम ही आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाची क्रांती मानली जाते. या पद्धतीद्वारा औषधांना अचूकपणे रुग्णाच्या गरजेनुसार पोहोचवले जाते. विशेषत: कॅन्सर, संसर्गजन्य रोगा, जीन थेरपी आणि व्हॅक्सीन्समध्ये याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. सुनील पवार यांनी लिपोसोमल ड्रग डिलिव्हरी डिवाईस यात केलेल्या संशोधनाला पेटन्ट मिळाले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीचे अध्यक्ष प्रदीप बोनगिरवार, व्यवस्थापकीय संचालक मोहन बोनगिरवार यांनी प्राचार्य सुनील पवार यांचे कौतुक केले. सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये त्यांच्या संशोधनाने विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत आहे. सुनील पवार यांच्या संशोधनाचे कौतुक होत आहे.

 

Comments are closed.