सुपर स्पेशालिटी आरोग्य शिबिराला 1300 रुग्णांची तपासणी

नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी केली रुग्णांची तपासणी

0

विवेक तोटेवार, वणी: हॉस्पिटलला जत्रेचे स्वरुप आले होते. प्रत्येक माळ्यावर रुग्णांची खचाखच गर्दी होती. वेगवेगळ्या आजारावरील रुग्णांसाठी स्वतंत्र्य व्यवस्था होती. गर्दी असली तरी नियोजनात शिस्तबद्धता होती. पहिल्यांदाच विविध प्रकारच्या अत्याधुनिक मशिन हॉस्पिटलमध्ये लावण्यात आल्या होत्या. ही सर्व लगबग होती मोफत सुपर स्पेशालिटी आरोग्य शिबिराची. वणीमध्ये रविवारी दिनांक 11 ऑगस्ट रोजी लोढा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे 1300 रुग्णांनी तपासणी केली. नागपूर येथील न्यू ईरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टरांनी वणी आणि परिसरातील रुग्णांची तपासणी केली. डॉ. महेंद्र लोढा यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.

वणीमध्ये मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध असले तरी अनेक दुर्धर आजारांसाठी रुग्णांना नागपूर येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गाठावे लागते. त्यासाठी खर्चही मोठा असतो. अनेक गरीब रुग्णांना हा खर्च झेपणारा नसतो. त्यामुळे डॉ. महेंद्र लोढा यांनी सुपर स्पेशालिटी सेवांसाठी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात मेंदूरोग, हृदयरोग, मानसिक आजार, गुप्तरोग, त्वचारोग, किडणी रोग इत्यादी आजारांवरील रुग्णांची नागपूर येथील विख्यात तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी केली. तसेच कर्णबधिर लोकांना कर्णयंत्राचे वाटपही करण्यात आले.

शिबिरात मेंदूरोग सर्जरीसाठी डॉ. नीलेश अग्रवाल, डॉ. गौरव आमले, हृदयरोग सर्जरीसाठी डॉ. आनंद संचेती, हृदयरोग निदानासाठी डॉ. निधेश मिश्रा, मेंदूरोग साठी डॉ. पराग मून, नेत्ररोग डॉ. सौरभ मुंधडा, डॉ. सौरभ अग्रवाल, मानसिक रोग डॉ. श्रेयस मांगिया, दंतरोग डॉ. कविता देशमुख, पोटविकार डॉ. विजेंद्र किरनाके, बालरोग डॉ. स्वप्निल भिसीकर, डॉ. अभिजीत चौधरी, मुत्ररोग डॉ. शब्बीर राजा, मधुमेह डॉ. अमोल कोकास, प्लास्टिक सर्जरी डॉ. अनुप सारडा, किडनी रोग डॉ. अमित पासारी, अस्थिरोगसाठी डॉ. उत्सव अग्रवाल यांनी रुग्णांची तपासणी केली.

वणीत पहिल्यांदाच सुपर स्पेशालिटी शिबिराचे आयोजन – डॉ. महेंद्र लोढा
या शिबिरात मनक्याचे रुग्ण, मेंदुरोगाचे रुग्ण, किडणीचे रुग्ण, मधूमेह, हृदयरोग, पोटविकार, मानसिक, नेत्ररोग, मेंदुरोग सर्जरी इत्यादी सर्वच प्रकारचे रुग्ण आले. अनेक दुर्धर आजारांवर त्या रोगांचे स्पेशालिस्ट परिसरात उपलब्ध नसल्याने रुग्णांना नागपूर गाठावे लागते. त्यामुळे नागपूरच्याच स्पेशालिस्टना इथे आणण्याचे निश्चित केले. त्याचा मोठा फायदा परिसरातील गरीब रुग्णांना झाला. 

वणीतील डॉक्टरांसाठी विशेष कार्यशाळा
शिबिरानंतर नागपूर येथील न्यू ईरा हॉस्पिटलच्या शिबिरासाठी आलेल्या डॉक्टरांनी कार्यशाळा घेतली. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टारांनी नवीन टेक्नॉलॉजी, उपचार, अत्याधुनिक पद्धत याबाबत मार्गदर्शन केले. तसेच अत्यावश्यक वेळी कोणती काळजी घ्यावी याबाबत ही मार्गदर्शन केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!