डॉ. श्याम जाधव (नाईक) यांनी घेतली मुस्लिम बांधवांची भेट

कारंजा, धनज, मनभा गावाला भेट, ईदच्या दिल्या शुभेच्छा

0 164

कारंजा: बकरी ईद निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्हीजेएनटी सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्याम जाधव (नाईक) यांनी बकरी ईद निमित्त कारंजा, धनज (बु), मनभा इत्यादी गावात जाऊन मुस्लिम बांधवांची भेट घेतली. सोमवारी सकाळी 10 वाजता कारंजा येथील ईदगाह मैदानात जाऊन त्यांनी मुस्लिम बांधवाची भेट घेत त्यांना गुलाबाचे फुल देत बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधला. कारंजा नंतर त्यांनी धनज (बु) व मनभा या गावाला भेट दिली. इथे त्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत त्यांच्या सोबत ईद साजरी केली. यावेळी विजय नाईक, संजय जाधव, युवराज जाधव, गोपाळ राठोड, प्रकाश राठोड, रामेश्वर राठोड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Loading...