लाचखोर पुरवठा निरीक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात

कंट्रोल डिलरला मागितली होती लाच, रंगेहात पकडले...

विवेक तोटेवार, वणी: तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक संतोष उईके याला 70 हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली. संतोष उईके याने एका कंट्रोल डिलरला लाच मागितली होती. गुरुवारी दिनांक 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 4.15 वाजता ही कारवाई करण्यात आली. सदर कारवाई अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागात निरीक्षक म्हणून संतोष उईके कार्यरत आहे. काही दिवसांआधीच उइके वणी येथे रुजू झाला होता. एका कंट्रोल डिलरला कामासाठी त्याने लाच मागितली होती. विक्रेत्याने याची तक्रार अमरावती येथील लाचलुचपत विभागाला दिली होती. त्यानुसार आज गुरुवारी दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सापळा रचला. दुपारी 4.15 वाजताच्या सुमारास संतोष उईके याने 70 हजार रुपयांची लाच स्वीकारली.

लाच स्वीकारताच त्याला अटक करण्यात आली. त्याला ताब्यात घेऊन वणीतील शासकीय विश्रामगृह येथे चौकशीसाठी नेण्यात आले. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक अमरावती विभागाचे निरीक्षक योगेश दंदे व सहकारी यांनी केली. वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.