ॲड. सूरज महारतळे यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेस प्रवेश
आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज
जब्बार चीनी, वणी: वणीतील युवा सामाजिक कार्यकर्ते व वकील सूरज महारतळे यांनी चंद्रपूर येथे खासदार बाळू धानोरकर व माझी आमदार वामनराव कासावार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. सूरज महारतळे यांच्यासह गिरीश कुबडे, ऍड. शुभम महारतळे, सौरभ देरकर, आकाश बोबडे, हितेश थोटे, गौतम शाहारे, अमोल पोहाणे यांनी पक्षात प्रवेश घेतला.
यावेळी बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले की काँग्रेसची विचारधारा ही गोरगरीब कष्टकऱ्यांच्या हिताची आहे. सामाजिक कार्याला सत्तेची जोड असल्याशिवाय गोरगरीब समाजबांधवांचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकास होणार नाही. असे ते म्हणाले. काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणानुसार पक्षवाढीसाठी प्रयत्न करा असे आवाहन यावेळी बाळू धानोरकर यांनी कार्यकर्त्यांना केले.
काँग्रेस पक्ष हा विशाल महासागर आहे. काँग्रेस पक्षात कोणीही प्रवेश करू शकतो. काँग्रेस पक्ष मजबूत होण्यासाठी काही गोष्टी करणे भाग असते. त्याचाच एक भाग म्हणून इतर पक्षातील कार्यकर्ते व नेत्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करते. युवकांनी देखील मोठ्या प्रमाणात काँग्रेसचा विचार अंगीकारणे गरजेचे आहे. पुढे देखील अशाच प्रकारे संघटन वाढीकरिता काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्ष प्रवेशाच्या वेळी जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम आवारी, वणी तालुकाध्यक्ष प्रमोद वासेकर यांची उपस्थिती होती. ऍड सूरज महारतळे यांनी युवकांसाठी विविध उपक्रम शहरात राबवले होते. तसेच बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी त्यांनी वणीत लक्षवेधी मोर्चाचे आयोजनही केले होते. त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला आगामी निवडणुकीत चांगला फायदा होईल असे बोलले जात आहे.
हे देखील वाचा:
प्रशिक्षणाच्या नावाखाली वणीत बेकायदेशीररित्या गरब्याचे आयोजन
Comments are closed.