सुशगंगा पब्लिक स्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये प्रवेश सुरु
नर्सरीपासून वर्ग 1 ते वर्ग 11 वी (विज्ञान) पर्यंत घेता येणार प्रवेश
वणी बहुगुणी, डेस्क: स्वावलंबी शिक्षण संस्था प्रणीत वणी-वरोरा रोडवरील नायगाव जवळील सुशगंगा पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यात विद्यार्थ्यांना वर्ग 1 ते वर्ग 11 पर्यंत प्रवेश घेता येणार आहे. विशेष म्हणजे या वर्षीपासूनच या ठिकाणीच सुशगंगा ज्यु. कॉलेज सुरु होत असून यात 11 वी विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेता येणार आहे. स्वावलंबी संस्थेचे लिटल ज्वेल इंटरनॅशनल प्ले स्कूल यावर्षीपासून वरोरा रोडवरील महावीर भवन जवळ सुरु होत आहे. येथे नर्सरी, केजी, प्लेस्कूल येथे प्रवेश घेता येणार आहे. नर्सरी, प्ले स्कूल तसेच शाळा व कॉलेज प्रवेशासाठी सकाळी 9 वाजता ते दुपारी 3.30 पर्यंत शाळेच्या कार्यालयात भेटून संपर्क साधावा, किंवा अधिक माहितीसाठी 9860078238 तसेच 9403207477 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शाळा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
अत्याधुनिक शिक्षण पद्धतीचा वापर
शाळा व कॉलेजमध्ये अभ्यासासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासाकडे लक्ष दिले जाते. तसेच शिकवण्यासाठी विद्यार्थी केंद्रीत शिक्षण प्रणालीचा (child centric learning system) उपयोग केला जातो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष असते. यासह उद्योजक्ता, क्रिएटीव्हीटी, आर्टिफिशिअल इंटलिजन्स, वित्तीय साक्षरता इत्यादींमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास होतो.
सुशगंगा पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे शिकवण्यासाठी अनुभवी व प्रशिक्षित शिक्षकवर्ग आहेत. सुसज्ज असे स्मार्ट क्लास, सर्व सोयीसुविधा असलेली प्रयोगशाळा आहे. तसेच खेळात आवड असणा-या विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे साहित्य तसेच प्रशिक्षक उपलब्ध आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा देखील उपलब्ध आहे.
उत्कृष्ट रिझल्ट हीच यशाची पावती – प्राचार्य
शाळेची उत्कृष्ट निकालाची परंपरा आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं हेच आमच्या यशाचे गमक आहे. शिक्षणासह विद्यार्थ्यांचे कलागुण, खेळ, कल्पकता इत्यादी गोष्टीसाठी देखील त्याला प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास शाळेत होतो. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
– प्राचार्य, सुशगंगा पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज
अधिक माहितीसाठी संपर्क-
सुशगंगा पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज (वर्ग 1 ते 11 वी)
ठिकाण – नायगाव जवळ, वरोरा रोड, वणी जिल्हा यवतमाळ
लिटल ज्वेल इंटरनॅशनल प्ले स्कूल (नर्सरी, केजी, प्लेस्कूल)
ठिकाण – महावीर भवन जवळ, वरोरा रोड वणी
वेळ – स. 9 ते दु. 3.30 वाजेपर्यंत, सुटीच्या दिवशी बंद
अधिक माहितीसाठी संपर्क – 9860078238 किंवा 9403207477
Comments are closed.