आज वणीत दणाणणार सुषमा अंधारे यांची मुलुख मैदानी तोफ

संत रविदास महाराज यांचा जयंतीनिमित्त पहिले प्रबोधन पर्व

बहुगुणी डेस्क, वणी: महाराष्ट्राची दणाणनारी तोफ म्हणून सुप्रसिद्ध वक्त्या सुषमा अंधारे यांची ओळख आहे. त्यांच्या तेजस्वी आणि अभ्यासपूर्ण व्याख्यानांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजतो. त्यांची वाणी ऐकण्यासाठी दुरदुरून श्रोते येतात. त्या सुषमा अंधारे यांच्या व्याख्यानाची मुलुख मैदानी तोफ वणीत गाजणार आहे. शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारीला फुले, शाहू, आंबेडकरी विचारवंत ख्यातनाम वक्त्या सुषमा अंधारे ह्या “प्रबोधन पर्व पहिले” अंतर्गत व्याख्यानातून त्या आपले विचार मांडतील. हे प्रबोधन पर्व शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता वणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील श्री संत रविदास प्रबोधन केंद्रात होईल.

गुरू रविदास जयंती निमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघ, वणी, जिल्हा यवतमाळ, संत रविदास प्रबोधन केंद्र व संत रविदास चर्मकार सुधार मंडळ, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने १४ व १५ फेब्रुवारीला विविध कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून खा. प्रतिभा धानोरकर, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सरोज बिसुरे, एकविरा बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष किरण देरकर, राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रदेश अध्यक्ष मीना भागवतकर राहतील. विशेष अतिथी अंजली भानुदास विसावे असतील. राष्ट्रीय चर्मकार महासंघ, महिला आघाडीच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्ष सुनिता लांडगे आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघ, युवती आघाडीच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्ष प्रणोती बांगडे यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती राहील.

या कार्यक्रमाला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संत रविदास महाराज प्रबोधन केंद्र, संत रविदास चर्मकार सुधार मंडळ तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विदर्भ अध्यक्ष संबा वाघमारे यांनी केले आहे.

Comments are closed.