सावित्री-जिजाऊच्या विचारांचे वारसदार व्हा-प्रा.सुषमा अंधारे
मारेगावात सावित्री जिजाऊ जयंती निमित्य कार्यक्रम
ज्योतिबा पोटे, मारेगाव: ज्या महानायिकेंनी समाजासाठी प्रस्थापित लोकाचा त्रास सहन केला त्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांचं नाव अग्रस्थानी आहे. यांनी विज्ञानवादी विचार दिले. ते विचार अंगीकारलेले तरच आजच्या शिकलेल्या स्त्रिया आत्मनिर्भय बनू शकेल असे प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते प्रा.सुषमा अंधारे यांनी केले. मारेगाव येथे शेतकरी सुविधा केंद्र येथे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारिप चे तालुका अध्यक्ष विनोद गाणार होते तर विचारपीठावर पुरूषोत्तम पाटील, मंगल तेलंग, पुंडलिकराव साठे, नगरसेवक उदय रायपुरे, मारेगावचे ठाणेदार अमोल माळवे, भगवान इंगळे हे होते.
प्रस्तुत कार्यक्रमात महिलाची उपस्थिती लक्षनिय होती, सुषमा अंधारे यांनी महिलांच्या कर्मकांडावर विस्तृत असे विवेचन करुन, महिलांना भयमुक्त करन्यासाठी पुराणातील उदाहरणासह आपल्या शैलीतुन सलग दोन तास चाललेल्या व्याख्यानातून समाज प्रबोधन केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक भगवान इंगळे यांनी केले,तर सुत्रसंचालन गजानन चंदनखेडे यांनी केले हा कार्यक्रम मारेगाव तालुका भारिपच्या वतीने आयोजित करन्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजाबराव गजभिये,गौतम दारुण्डे, राजेंद्र करमनकर, गजानन चंदनखेडे, अनंता खाडे, भगवान इंगळे, गोरखनाथ पाटील, गौतम वाळके, विलास रायपुरे, नरेश चिकाटे, हंसराज पाटील, नागेश रायपुरे इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.