बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याची दादागिरी, हॉटेलमध्ये तोडफोड
वणी/विवेक तोटेवार: वणीतील बसस्थानकाजवळ असलेल्या आस्वाद हॉटेलमध्ये सोमवारी दुपारी 2.15 वाजताच्या सुमारास एक बडतर्फ असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने व त्याच्या तीन साथीदारांनी शुल्लक कारणावरून वाद घातला. तसेच वाद घालून तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकाराने भयभीत झाल्याने हॉटेलच्या मालकीणला हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, वणीतील बसस्थानकाच्या बाजूला विकास प्रकाश बग्गा हे आपल्या आई वडिलांसोबत आस्वाद नावाचे हॉटेल चालवितात. सोमवारी दुपारी 2.15 वाहताच्या सुमारास आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी नफिस शेख, शंकर सिंग, अफसर व आणखी एक इसम जेवणाकरिता आले. त्यांनी सुरवातीला बेसिंगमध्ये पाणी नसल्याच्या कारणावरून वाद घातला. यानंतर पाण्याच्या बॉटलची मागणी केली परंतु लाईट नसल्याने पाणी थंड नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. पाणी थंड का नाही यावरून त्यांनी वेटरशी वाद घातला. सोबतच त्यांनी जेवण करताना ठेशाची मागणी केली असता लाइट नसल्याने ठेचा बनवण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली. यावरून पुन्हा वाद झाला.
जेवण करीत असतानाच वेटरने लाइट आल्याबरोबर ठेचा दिला. परंतु त्यांनी हा ठेचा का आणला म्हणून वाद घळण्यास सुरवात केली. यावेळी प्रकाश हे किराणा आणण्यासाठी बाजारात गेले होते. तर विकास यांच्या आई ज्योती प्रकाश बग्गा ह्या यावेळी हॉटेलमध्ये होत्या. त्यांनी मध्यस्ती करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. परंतु नफिस शेख यांनी पाण्याची बॉटल डोक्यावर फोडून तुला जीवे मारून टाकणार व शंकर यानी हा ठेचा तुझ्या अंगाला लावून देईन अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात करण्यात आलाय.
ज्योती या सर्व प्रकाराने घाबरल्या व त्यांना हृदय विकाराचा झटका आला. याची माहिती विकास यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून त्यांनी त्यांच्या आई ज्योती यांना वणीतील सुगम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या ज्योती बग्गा यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहे. प्रकाश यांच्या कडे काम कर्मचाऱ्याने ही सर्व घटना आपल्या मालकास सांगितली. प्रकाश यांनी वेळ न दवडता त्वरित वणी पोलीस स्टेशन गाठून चारही आरोपीविरुद्ध 307 भा द वि नुसार गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महादेव पडघन करीत आहे.
महादेव पडघन वणी बहुगुणीशी बोलताना म्हणाले की…
आपण आरोपीचा मागोवा घेत आहे व लवकरच आरोपीला हेरेबंद करण्यात येईल. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कुणासही सोडण्यात येणार नाही. आम्ही तपास चक्र फिरवायला सुरवात केली असून लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात येणार आहे. योग्य ती कार्यवाही पोलिसांकडून करण्यात येईल.