पुरुषोत्तम नवघरे, वणी: सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम राबविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मागील चार वर्षात ५ दा रक्तदान शिबिर आयोजित करून अनेक गरजू रुग्णांना मोफत रक्त देखील उपलब्ध करून दिले आहे. या वर्षी शनिवार १४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर येथील लाईफ लाईन ब्लड बँक यांच्या सहकार्याने आयोजित शिबिरात ४३ लोकांनी सहभाग घेतला. या शिबिराच्या यशस्वितेसाठी अभय गटलेवार, रूपक अंड्रस्कर, कल्पक अंड्रस्कर , दिनेश साखरकर, राजीव साखरकर , रितेश साखरकर, शुभम झिलपे, ऋतिक झिलपे, प्रसाद झिलपे, दीपक साखरकर, शंकर झीलपे , प्रशांत झिलपे, अनुज मुकेवार आदींनी परिश्रम घेतले.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Next Post
Comments are closed.