दोन व्यक्तींचे स्वॅब पुन्हा तपासणीसाठी पाठवणार

एका प्रतिबंधीत क्षेत्रातील रहिवाशांचा मुक्त संचार....

0 4,640

जब्बार चीनी, वणी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 68 व्यक्तींचे स्वॅब तापसणीसाठी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत 58 रिपोर्ट प्राप्त झाले असून 53 व्यक्ती निगेटिव्ह आलेल्या आहेत तर 3 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्या आहेत तर उरलेल्या 2 व्यक्तींचे सॅम्पल पुन्हा घेतले जाणार आहे. 10 रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहेत. शहरात सध्या 71 व्यक्ती हाय रिस्क (अती जोखिम) मध्ये असून 118 व्यक्ती लो रिस्कमध्ये आहेत. आतापर्यंत नागपूर येथे तपासणी झालेले 3 व्यक्ती व यवतमाळ येथे तपासणी झालेले 3 असे एकून 6 रुग्ण वणीत निषन्न झाले आहेत.

जाहिरात

जाहिरात

कोरोनात अफवांचा बाजार सुरूच
गुरुवारी वणीत एकही पॉजिटिव्ह रुग्ण न आढळल्याने वणीकरांना दिलासा मिळाला. मात्र काल वणीत दिवसभर अफवांचा बाजार सुरुच होता. वणीतील एका परिसरात दोन व्यक्तीला होम कॉरेन्टाईन करण्यासाठी प्रशासनाची टीम गेली होती. दरम्यान त्या भागात रुग्ण सापडल्याने तो परिसर सिल करण्यात आल्याची अफवा शहरात वा-यासारखी पसरली. मात्र आधीच्या दोन परिसराशिवाय तिसरा कोणताही परिसर सिल झाला नसल्याची व 6 व्यतिरिक्त सध्यातरी आणखी रुग्ण सापडला नसल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. तसेच अफवा पसरवू नका व त्यावर विश्वास ठेऊ नका असे आवाहन ही प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. दरम्यान या परिसारातील काही तरुणांनी खबरदारी म्हणून संपर्ण परिसर फवारणी करून निर्जंतूक केला.

जाहिरात

जाहिरात

एका प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांचा मुक्त संचार
वणीत सहावा रुग्ण सापडताच ढुमेनगर परिसर सिल करण्यात आला. या परिसरात लो टी महाविद्यालयसमोरील (वरोरा रोड) व हनुमान मंदिरजवळील रस्ता सिल करण्यात आला आहे. मात्र हनुमान मंदिर बाजुच्या प्रतिबंधीत क्षेत्राच्या सिमेवर कुणीही नसल्याने या क्षेत्रातील नागरिकांनी काही काळ बाहेर चांगलाच मुक्त संचार केला. प्रतिबंधीत क्षेत्र झाल्यापासून येथे सुरक्षा रक्षक होते. मात्र आज सकाळपासून दुपारपर्यंत काही काळ येथे सुरक्षा रक्षक नसल्याची माहिती तिथल्या नागरिकांनी दिली आहे. याबाबत सिमारेषेबाहेरील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मास्क व सॅनिटायजर वाटप करण्याची मागणी
वणीत कोरोनाचा वाढता प्रकोप बघून गुरुदेव सेनेतर्फे खबरदारी म्हणून शहरातील प्रत्येक नागरिकांना मास्क व सेनीटायझरचे मोफत वाटप करावे अशी मागणी केली आहे. याबाबत श्री गुरुदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना निवेदन दिले.

Comments
Loading...