न. प. शाळा क्र. 4 मध्ये राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान जनजागृती कार्यक्रम
विद्यार्थी व शिक्षकांनी केला चीनी मालावर बहिष्कार घालण्याचा संकल्प
वणी: लोकनायक बापूजी अणे न. प. शाळा क्र. 4 मध्ये स्वदेशी सुरक्षा अभियानाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. यात देशप्रेमी नाररिकांनो जागे व्हा, चीनी वस्तुंवर बहिष्कार टाका, अशी शपत देऊन जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशांत भालेराव होते तर प्रा. महादेव खाडे यांनी मार्गदर्शन केले.
चीनी मालावर बहिष्कार टाका, स्वदेशी वस्तुंचा वापर केल्या शिवाय आपला देश स्वावलंबी होणार नाही, स्वदेशी मालाचं महत्त्व, यावर मार्गदर्शन करण्यात आलं. कार्यक्रमात विद्यार्थी आणि शिक्षकांनी स्वदेशी वस्तू वापरून चीनी मालावर बहिष्कार टाकण्याची शपत घेतली.
(आमदारांनी दिले परिवहन मंत्र्याला निवेदन)
कार्यक्रमाला मुख्यध्यापक परसावर, प्रमिला अवचट यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचं संचालन अविनाश पालवे यांनी केलं तर किरण जगताप यांनी आभार प्रदर्शन केलं.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लता ठमके, कला शिक्षक सागर मुने, तृप्ती पावडे, इंदु मालेकर, मंदताई गाडगे यांनी परिश्रम घेतलं. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.